पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचे परिचय,वैशिष्ट्ये, निकष पात्रता,फायदे, विविध प्रकार,महत्त्वाची माहिती,आवश्यक कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती.
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना
नमस्कार मित्रांनो आज आपण PM किसान ट्रॅक्टर योजना ची संपूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्या देशामध्ये ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आहे.PM किसान ट्रॅक्टर योजना ही केंद्र सरकारने चालू केलेली योजना आहे. ही योजना चालू करण्याचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची सामग्री उपलब्ध करून देणे हा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप योजना चालू केलेला आहे त्याच्यातली ही एक योजना आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी व शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने PM किसान ट्रॅक्टर योजना ही 2024 मध्ये चालू केली आहे. PM किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये आर्थिक कार्यक्षमतेने शेती करता येईल.
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना परिचय
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा परिचय
PM किसान ट्रॅक्टर योजना केंद्र सरकार द्वारे राबवण्यात आलेले शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहेत. काही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही चिंताजनक असते त्यामुळे ते शेतीला लागणारे साहित्य किंवा ट्रॅक्टर घेऊ शकत नाही त्यामुळे सरकारच्या या योजनेमुळे असे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा मिळतो. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते.PM किसान ट्रॅक्टर योजना योजनेचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे व शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20% ते 50% टक्के अनुदान भेटते.
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना वैशिष्ट्ये
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा वैशिष्ट्ये
- ट्रॅक्टर खरीदीसाठी अनुदान रक्कम: पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के पर्यंत अनुदान भेटते. हे अनुदान ट्रॅक्टरच्या किमतीवर अवलंबून असते.
- लाभ मिळणारे शेतकरी: या योजने अंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकरी महिला शेतकरी तसेच अनुसूचित जाती व इतर जातीतील मागासवर्गीय शेतकरी यांना प्रधान्य दिले जाते.
- योजनेअंतर्गत कोणते ट्रॅक्टर मिळतात: शेतकऱ्यांना त्यांची शेतीची गरज बघून व त्यांचे आर्थिक बचत बघून सरकारी व खाजगी या ब्रँड मधून ट्रॅक्टर निवडून त्यांना हवं ते ट्रॅक्टर दिले जाते.
- योजनेसाठी अर्ज प्रक्रिया: या योजनेसाठी शेतकरी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात.
- आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणे: योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री उपयोग करून शेतीतील उत्पन्नाचा वाढ करणे शेतकऱ्याला आधुनिक शेती करणे यामुळे शेतकऱ्यांचा खूप वेळ वाचतो
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना पात्रता निकष
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची पात्रता निकष
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेची पात्रता निकष खालील प्रमाणे
- लाभार्थी हा शेतकरी असायला पाहिजे:लाभार्थी हा भारतातील नागरिक व रहिवाशी असायला हवा व त्याच्या नावावर शेतजमीन हवी.
- जमीन मालकीच्या जमिनीचा पुरावा: लाभार्थ्याकडे शेतीसाठी लागणारी शेतजमीन पाहिजे.जमिनीचा ७/१२ उतारा लाभार्थ्याच्या नावावर पाहिजे.
- कुटुंबातील व्यक्तीला लाभ मिळेल:या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळेल.
- या पहिले इतर कोणतेही अनुदान लागू नाहीत: लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी अनुदान घेतलेले नसावे.
- स्त्री शेतकऱ्यांना प्राधान्य: या योजने अंतर्गत स्त्री शेतकऱ्यांना जास्त प्रधान्य दिले जाते. या योजनेमुळे स्त्री शेतकऱ्यांचा खूप फायदा होतो
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना साठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
- ओळखपत्र: आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड इत्यादी.
- पत्त्याचा पुरावा: राशन कार्ड विजेचे बिल आधार कार्ड किंवा इतर अजून कोणतेही दस्तावेज.
- शेतीचे कागदपत्र: जमीन मालकीचे प्रमाणपत्र किंवा जमिनीचा 7/12 उतारा.
- बँक खाते: लाभार्थ्याचे राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया या बँककेत खाते असणे आवश्यक व पासबुक आवश्यक आहे.
- फोटो: पासपोर्ट आकाराचा फोटो.
- जात व उत्पन्न प्रमाणपत्र: हे फक्त अनुसूचित जाती व जमातीसाठी.
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना अर्ज प्रक्रिया
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन दुसरी ऑफलाईन.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत.
- पी एम किसान ट्रॅक्टर योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या(https://pmkisan.gov.in/) किंवा संबंधित राज्य सरकारच्या साईटला भेट द्या.
- भेट दिल्यानंतर पीएम किसान ट्रॅक्टर योजना हा विभाग निवडा.
- अर्जदाराचे संपूर्ण नाव आधार क्रमांक पत्ता आणि इतर तपशील व्यवस्थित न चुकता भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा म्हणजेच आधार कार्ड,राशन कार्ड,7/12 उतारा, बँक खात्याचे पासबुक,पासवर्ड फोटो,जात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करा.
- यानंतर अर्ज सबमिट करा सबमिट झाल्यानंतर अर्ज क्रमांक जतन करा.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत.
- तुमच्या आजूबाजूला असलेले कृषी कार्यालयात भेट द्या.
- पी एम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारा अर्ज घ्या.
- अर्ज व्यवस्थित वाचून भरा व त्याला लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडा.
- फॉर्म सबमिट करा नंतर त्याची पावती मिळवा.
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना योजनेचे फायदे
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचे फायदे
- शेतकामासाठी लागणारे मनुष्यबळ कमी होते: ट्रॅक्टर मुळे शेतीचे कामे वेळेवर आणि लवकर पूर्ण होतात आणि ते त्यात उत्पन्नाची खूप वाढ होते.
- पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीला चालना: आधुनिक यंत्रामुळे शेतीतले कामे वेळेवर पूर्ण होतात आणि त्यामुळे वेळेवर काम पूर्ण झाल्यामुळे उत्पन्न वेळेवर निघते आणि त्यात उत्पन्नामध्ये भर पडते.
- पैशांची बचत: सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर खरेदी साठी लागणारा खर्च कमी होतो. यात शेतकऱ्यांची पैशाची बचत होते तो पैसा शेतकरी दुसऱ्या कामासाठी वापरू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होतो.
- स्त्रियांचे सक्षमीकरण: ज्या पण महिला शेतकरी आहे त्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देऊन शेतीसाठी अनुदान देऊन त्यांचा आर्थिक व सामाजिक दर्जा सुधरतो.
- ग्रामीण क्षेत्रांचा विकास:या योजनेअंतर्गत शेतीसाठी आधुनिक साधनसामग्री उपयोग केल्यामुळे त्यांचे वेळेची बचत होते शेतीचे काम वेळेवर पूर्ण होतात व उत्पन्न चांगल्या प्रमाणात मिळते त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाचा चालना मिळते. यामुळे शेतकऱ्यांचाआर्थिक व सामाजिक दर्जा उंचावतो.
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना विविध प्रकार
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचे राज्यनिहाय योजनांचे विविध प्रकार
- प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे पण जे पण राज्य सरकार या योजनेमध्ये सहभाग आहे ते आपापल्या राज्यात याबाबत पूरक योजना पण राबवतात. उद्याहरण खालील प्रमाणे
- महाराष्ट्र: या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्राकडून दिलेले अनुदान व्यतिरिक्त राज्य सरकारकडून पण अजून अनुदान दिले जाते.
- उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांसाठी लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेष योजनेची लाभ देते.
- बिहार: बिहार सरकार त्यांच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी व इतर उपक्रम खरेदीसाठी आर्थिक मदत ते राज्य सरकार देते.
अजून वाचा :Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Scheme| डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना महत्त्वाची माहिती
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती
- प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ वापरलेल्या ट्रॅक्टर वर भेटणार नाही हा लाभ फक्त नवीन ट्रॅक्टर साठी लागू असेल.
- लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याकडे खरे कागदपत्रे व सगळे कागदपत्रे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमची अनुदान रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
- या योजनेअंतर्गत असलेल्या सबसिडीवर वेळोवेळी वेगवेगळे बदल होऊ शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा तुमच्या नावावर पाहिजे.
- या योजनेअंतर्गत असलेल्या सबसिडीवर वेळोवेळी वेगवेगळे बदल होऊ शकतात.
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा EYC Form
PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना निष्कर्ष
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा निष्कर्ष
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना ही 2024 ला चालू झालेली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे, या योजनेमधून शेतकऱ्यांचा वेळ पण वाचतो आणि आर्थिक उत्पन्न पण खूप प्रमाणात वाढते. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती साधण्यात खूप मदत होते. ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणारे अनुदान शेतकऱ्यांचे आर्थिक वजन कमी करते यामुळे शेतकरी ती आर्थिक रक्कम दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतात. शेतीसाठी लागणारे मनुष्यबळ पण कमी होते. ही योजना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत लाभदायक योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही वेळेवर अर्ज करावा व शेतीला आधुनिकत्याचीजोड करून घ्यावी.