मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे परिचय,लाभ,पात्रता,योजनेची वैशिष्ट्ये,आवश्यक कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया महत्त्वाची माहिती संपूर्ण माहिती.
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना
नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची माहिती बघणार आहोत ही योजना महाराष्ट्र सरकारने 27 जून 2024 या रोजी चालू केलेली आहे या पहिले महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही चालू केली होती त्यानंतर बेरोजगार युवकांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना म्हणजेच लडका भाऊ योजना चालू केली आहेत. या योजनेअंतर्गत बेरोजगार युवांना रोजगार प्रदान केला जातो. आजकाल महाराष्ट्र मध्ये बेरोजगार युवकांची संख्या खूप वाढली आहे त्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे.
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील सुशिक्षित युवांना मुक्त मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत दर वर्षी या योजनेचा लाभ 50 हजार युवकांना दिल्या जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार युवकांची वय 18 ते 35 या वर्षीय वयोगटातील पाहिजे.
या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महाराष्ट्रातील युवांना रोजगारांसाठी तयार करणे. या योजनेअंतर्गत युवकांना उद्योजकासह व्यवहारिक प्रशिक्षण पण दिले जाते. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा सहा महिने असतो. या योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षणासोबत रोजगारांची रोजगार मिळण्याची शक्यता वाढते. ही योजना सरकारी व प्रायव्हेट दोन्ही संस्थांमध्ये शामिल आहे.या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 5500 करोड रुपयाचे आर्थिक बजेट बनवलेले आहे.मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना पात्रता योजनेचा लाभ अर्ज कोण करू शकते वय मर्यादा आवश्यक कागदपत्रे काय इत्यादी सर्व प्रकारची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना परिचय
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा परिचय
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली ही बेरोजगार युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहेत. या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना व्यवहारिक व काय याचा अनुभव देणे व रोजगाराची क्षमता वाढवणे या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणाधोरण त्यांची शैक्षणिक योग्यता नुसार त्यांना वेतन दिले जाते वेतन 6000 किंवा 1000 दिले जाते. हे वेतन त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होते.
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची वैशिष्ट्ये
- युवकांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजदारा सक्षम करणे.
- बारावी आयटीआय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार महास्वयम संकेतस्थळावर जाऊन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील.
- विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ मागणी ऑनलाईन नोंदवतील.
- सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण ची संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना उपलब्ध होतील.
- सदर कार्य प्रशिक्षण चा कालावधी हा सहा महिने असेल या कालावधीमध्ये उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन दिल्या जाईल.
- सदर विद्य वतन उमेदवारांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना पात्रता
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता खालील प्रमाणे.
- उमेदवार हा महाराष्ट्रातील असावा व त्याच्याकडे महाराष्ट्राची रहिवासी प्रमाणपत्र असावे.
- उमेदवारांना अर्ज करण्यासाठी किमान 18 वर्ष वय आवश्यक आहे जास्तीत जास्त 35 वर्षे वय आवश्यक आहे.
- उमेदवार हा बेरोजगार असायला हवा.
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बारावी आयटीआय पदविका पदवीधर पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असायला हवा.
- उमेदवार आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असायला हवे.
- उमेदवाराकडे रोजगार नोंदणी क्रमांक असायला हवा.
शासन निर्णय : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना
शैक्षणिक पात्रते नुसार दिले जाणारे विद्यावेतन
शैक्षणिक पात्रता | प्रति महिना विद्यावेतन |
10 वी / 12 वी पास | रु .6000 /- |
आयटीआय / पदविका | रु .8000 /- |
पदवीधर / पदयुक्तर | रु .12000 /- |
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लागणारे कागदपत्रेखालील प्रमाणे.
- ओळखीचा पुरावा : (आधार कार्ड /मतदान कार्ड/ पॅन कार्ड.)
- पत्ता पुरावा : (रहिवासी प्रमाणपत्र)
- वयाचा पुरावा : (आधार कार्ड/ मतदान कार्ड/ टीसी)
- शैक्षणिक प्रमाणपत्र : (दहावी पास /बारावी पास /आयटीआय /पदवी /पदवीत्तर)
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याचे पासबुक
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेला दोन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑफलाइन आणि ऑनलाईन.
ऑनलाइन अर्ज
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच च्या अधिकृत (https://cmykpy.mahaswayam.gov.in/) वेबसाईटला भेट द्या.
- होम पेज वरती आल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा विशेष विभाग दिसेल त्यावरती क्लिक करा.
- जर तुम्ही पहिली वेळस अर्ज करत असाल तर पहिले तुम्ही नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी खालील माहिती भरा जसे की तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी आधार नंबर एक पासवर्ड बनवा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
- यानंतर पोर्टल वरती जाऊन तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर आपला नया बटनावरती क्लिक करा.
- त्यानंतर तिथे मागितलेली तुमची सगळी व्यक्तिगत माहिती भरा.
- त्यानंतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करा.
- सर्व केल्यानंतर परत एकदा सगळी माहिती व कागदपत्रे परत एकदा तपासा.
- तुम्ही कोणतीही माहिती चुकीची भरली नसल्याची खात्री करा.
- माहिती चेक केल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा अर्ज सबमिट झाल्यानंतर एक मोज पावती क्रमांक तयार होईल तो जतन करा.
ऑफलाईन अर्ज
- तुम्हाला जर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नसाल तर तुम्ही ऑफलाईन पण अर्ज करू शकतात.
- तुमच्या जवळच्या जिल्हा कौशल्य विकास केंद्राला भेट द्या व तिथून या योजनेचा अर्ज घ्या.
- अर्ज घेतल्यानंतर त्या केंद्रातील अधिकारी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मदत करतील तो अर्ज व्यवस्थित भरा.
- अर्जाची संबंधित असलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडा.
- त्यानंतर तो अर्ज त्या जिल्हा कौशल्य विकास कार्यालय मध्ये मध्ये सबमिट करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी परत एकदा तपासून बघा तुम्ही सर्व माहिती बरोबर भरलेली आहे की नाही व तुम्ही कागद सगळे कागदपत्रे जोडलेले आहे की नाही.
- अर्ज सबमिट केल्यानंतर एक मोज पावती क्रमांक तयार होईल. कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडून ती पावती जतन करा.
अजून वाचा : Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना
Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना महत्त्वाची माहिती
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची महत्त्वाची माहिती
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांना सरकारी विभागात व विविध संस्थांमध्ये सहा महिन्याची प्रशिक्षण दिले जाते व त्याचा रोजगार पण सरकार देते. या रोजगार थ्रू युवकांना अनुभव प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेत अंतर्गत तरुणांना आर्थिक सहाय्यता व कौशल्य विकास सक्रिय प्रक्रियेचे ज्ञान मिळण्याची मोठा फायदा होतो. या योजनेचा लाभ घेऊन तरुण आपले करिअरला मोठ्या प्रमाणात सुरुवात करू शकतात व त्यांच्या आत्मविश्वास पण वाढतो. या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर वेळ वाया घालू नका लगेच वरती दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज करा व योजनेचा लाभ घ्या.