Ladki Bahin Yojana Update |कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार

Ladki Bahin Yojana Update |कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार नवीन माहिती,नवीन पात्रता संपूर्ण माहिती.

Ladki Bahin Yojana Update |कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली आहे,लाडकी बहीण योजना पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये त्यांनी आणि महायुतीला मिळालेले एकूण बहुमत पाहता आता लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली असं म्हणता येईल, आचारसंहितेची योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले नव्हते आणि आता मुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर महिलांना त्यांचे सरकारने वचन दिलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच मिळतील असं सांगितलं जात होतं ,नंतर 2100 लाडक्या बहिणींना देऊ असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, पण आता नव्या सरकारमध्ये राज्याचे कारभारी आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधी मिळणार असं विचारलं असता, आम्ही अर्थसंकल्पाच्या आर्थिक नियोजन योग्य प्रकारे झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल ते करू, हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना स्पष्ट केलेले आहे.आता त्यांच्या या विधानावरून महिलांना निवडणुकी अगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये महिन्याला मिळणार का कधी मिळणार आणि नेमके कोणाला मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊया.

निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना महायुतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असा आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार असं लाभार्थी महिलांकडून विचारले जात होतं यावरती देवेंद्र परिषदेमध्ये सविस्तर असं भाष्य केलेले, आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजनेचा प्रश्न विचारण्यात आला त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार असे विचारण्यात आलं यावरती बोलताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत, आता लाभ 2100 रुपये करणार आहोत.

अजून वाचा :Magel Tyala Solar Pump Scheme|मागेल त्याला सोलर पंप योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे मार्च नंतर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघून दिले जाणार आहे.लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे स्पष्ट इतर खात्यातील निधीमध्ये कपात सुद्धा करण्यात आलेली होती आता लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारला दिलेल्या वचनानुसार जर का वाढ करावी लागली यात काही अटींचा समावेश करण्यात आलेला आहे.

Ladki Bahin Yojana Update |कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार नवीन माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवीन माहिती

निवडणुकीच्या काळात कोणत्याही जास्त अटींची पडताळणी न करता आणि कागदपत्रांची योग्य छाननी न करता पात्र महिलांना पैसे देण्यात आले. फक्त एकच अट होती, ती म्हणजे त्या महिलाच असाव्यात.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बद्दल आता नवीन काही अटी आलेले आहेत आता परत पूर्ण अर्जांची परत छाननी करण्यात येणार आहे. यात ज्या महिला अपात्र असेल त्या महिला आता योजनेचा लाभ मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही केला आहे.

सर्व महिलांच्या कागदपत्रांची छाननी करून योग्य पात्र उमेदवाराला पैसे मिळतील अशी तजवीज करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे त्याच्यामुळे संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जर का इथे कुठेतरी त्रुटी आढळली येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

राज्यामध्ये 4.7 कोटी महिला मतदार आहेत त्याच्यातील जवळपास अडीच कोटी महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे.

योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणीत ज्याच्या मदतीने खोटे दावे केलेल्या आणि खोटे दावे करून योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांना येणाऱ्या काळामध्ये या यादीतून बाजूला काढला जाईल या योजनेअंतर्गत आधीच हप्ते या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी सबमिट केलेल्या कागदपत्रांची आता फेर तपासणी केली जाणार आहे.

शासन निर्णय :Ladki Bahin Yojana Update |कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार

Ladki Bahin Yojana Update |कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार योजनेचे नवीन पात्रता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवीन पात्रता

  1. योजना केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठीच लागू आहे या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांनाच पंधराशे रुपये मिळतील.
  2. 21 ते 60 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परत एकदा आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार.
  3. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
  4. ज्या महिलांचं एकत्र उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे.
  5. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले नसावा.
  6. लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे
  7. लाभार्थी महिलांचे पती इन्कम टॅक्स भरणारा नसावा.