बांधकाम कामगार कल्याण योजनेचे परिचय,लाभ,पात्रता,अर्ज रद्द होण्याची कारणे,आवश्यक कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया महत्त्वाची माहिती संपूर्ण माहिती.
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना
नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार योजनेविषयी माहिती बघणार आहोत ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मध्ये जेवढे पण कामगार आहेत त्यांना उपयोगी साहित्य पुरवणे जसे की कामगार किट जे पण कोणी पहिली बार नोंदणी करत असेल त्यांना पाच हजार रुपये पण मिळतात. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महाराष्ट्रातील जेवढे गरीब व कामगार लोक आहेत त्यांना च्या परिवारांना शिक्षण देणे आरोग्य विषयी सहाय्यता देणे आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवणे व सशक्त बनवणे हा आहे. बांधकाम कामगार योजनेचा आतापर्यंत महाराष्ट्रातील खूप नागरिकांनी फायदा घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत त्यांना सुरक्षा किट जीवनावश्यक साहित्य व पाच हजार रुपये मिळालेले आहे. ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी आहे.
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळ यांच्याकडून चालवण्यात येते. या योजनेअंतर्गत कामगार व कामगारांच्या परिवारातील सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. कामगाराच्या मुलांसाठी शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप भेटते. या सगळ्यांची या योजनेची सगळी माहिती आपण खालील लेखांमध्ये समजून घेऊया.
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना परिचय
बांधकाम कामगार कल्याण योजनेचा परिचय
बांधकाम कामगार कल्याण योजना महाराष्ट्र शासनाच्या कल्याण कामगार मंडळातर्फे सुरू केलेली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाने कामगारांच्या साठी चालू केलेली एक महत्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आर्थिक सहायता दिली जाईल. जे पण कामगार कल्याण योजनेसाठी पात्र ठरतात.यामध्ये अजून पण योजना आहे त्या योजनेचा पण लाभ त्यांना होतो. बांधकाम कामगार योजना अंतर्गत पात्रता असलेल्या व्यक्तींना राहण्यासाठी घरकुल पण मिळते. कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती पण दिली जाते यामुळे त्यांचा आर्थिक खर्च मध्ये खूप बचत होते. या शिष्यवृत्तीचा लाभ कामगारांच्या पत्नींना पण होतो.
या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र असलेले कामगार च्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कामगार योजनेत अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. आणि त्यांच्या परिवारांना मुक्त आरोग्यसेवा पण दिली जाते. या योजनेअंतर्गत कामगारांना रोजच्या रोजच्या आपण घरांसाठी वापरणाऱ्या साहित्य पण भेटते. या योजनेमुळे गरीब व गरजूंना आर्थिक मदत खूप होते. कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी पण आर्थिक सहाय्यता दिली जाते. जो कोणी व्यक्ती कामगार असेल त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करावा.
शासन निर्णय : Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना योजनेचा लाभ
बांधकाम कामगार योजनेचा लाभ
बांधकाम कामगार योजनेचा लाभ खालील प्रमाणे बघू शकता.
- आरोग्य विमा : बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर कामगारांचा काही अपघात झाला किंवा जीवथ हानी झाली तर यासाठी कामगारांना आरोग्य विमा मिळतो.कामगार च्या घरात जर कोणी पण का आजारी पडलं तर त्याला या आरोग्य विमा चा फायदा मिळतो. जर कामगाराचा मृत्यू
- झाला असं त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या परिवाराला आर्थिक मदत मिळते.कामगाराची पत्नी जर गर्भवती असेल तर तिला पण आर्थिक लाभ दिला जातो.
- शिष्यवृत्ती : कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते या शिष्यवृत्तीचा लाभ कामगारांच्या पत्नीने आपण होतो.
- घरकुल व रोजगार : या योजनेअंतर्गत कामगारांना राहण्यासाठी स्वतःचे घर मिळते.कामगार कल्याण योजना अंतर्गत फ्री प्रशिक्षण व रोजगार कामगारांना दिला जातो.
- पेन्शन : या योजनेअंतर्गत निवृत्त झालेल्या कामगारांना पेन्शन दिली जाते.
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना पात्रता
बांधकाम कामगार योजनेची पात्रता
बांधकाम कामगार योजनेची पात्रता खालील प्रमाणे.
- अर्जदार हा कामगार पाहिजे व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये त्याची नोंद पाहिजे.
- अर्जदाराचे अर्ज करण्यासाठी किमान वय वर्ष हे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत वय असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी गेल्या तीन वर्षांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करेल असावं व त्याच्याकडे त्याचे प्रमाणपत्र असावे.
- अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे व त्याच्याकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- प्लंबिंग पेंटिंग सुतारकाम सिमेंट किंवा वीट बांधणी लोखंड बांधकाम संडास सफाई कामगार इत्यादी संबंधित कामे करणार असावा.
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना अर्ज रद्द होण्याची कारणे
योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याचे मुख्य कारणे खालील प्रमाणे.
- अर्जदाराने जर अर्जामध्ये आपली खरी माहिती नाही भरली तर अर्ज बाद होण्याची शक्यता असते.
- अर्जदाराने जर अर्ज अपूर्ण भरला असेल तर अर्ज बाद होऊ शकतो.
- अर्जदाराने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडले नसेल तर अर्ज बाद होऊ शकतो.
- अर्जदार हा कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणीकृत कामगार नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
अजून वाचा : Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड मतदान कार्ड)
- रहिवासी पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र)
- वयाचा पुरावा (आधार कार्ड टीसी मतदान कार्ड)
- कामगार प्रमाणपत्र (कामगार म्हणून 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र)
- पासवर्ड आकाराचे तीन फोटो
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार योजनेचे अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार कल्याण योजनेचा अर्ज आपण दोन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑफलाइन आणि ऑनलाईन.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- अर्जदाराने जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील बांधकाम कामगार मंडळ यांच्या कार्यालयाला भेट द्या.
- बांधकाम कामगार मंडळ याच्या कार्यालयातून कर्मचाऱ्याकडून बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म घ्या व तो व्यवस्थित बरा.
- या अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव वय लिंक स्थायी पत्ता बांधकार कामगार म्हणून असलेला अनुभव यासंबंधी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाला आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे खात्रीपूर्वक बघून जोडा.
- नंतर भरलेला अर्ज संबंधित कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर संबंधित कार्यालयाचे अधिकाऱ्याकडून तुम्हाला योजनेची पावती दिली जाईल ती पावती घ्या.
- यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला कळविण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची
- योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला https://mahabocw.in/mr/ भेट द्या.
- या पोर्टलवर आल्यानंतर सर्वात पहिले नवीन खाते तयार करा. खाते तयार करताना तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी पासवर्ड टाकून खाते तयार करा.
- यानंतर पोर्टल वरती बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा यानंतर अर्ज उघडेल तो व्यवस्थित भरा. त्यामध्ये तुमची माहिती जसे की नाव वय लिंग पत्ता कौटुंबिक माहिती इत्यादी माहिती भरा.
- योजने संबंधित सर्व आवश्यकते कागदपत्रे अपलोड करा जसे की आधार कार्ड वयाचा पुरावा रहिवासी पुरावा नवादिवसाच्या कामाचा पुरावा पासवर्ड आकाराचा फोटो इत्यादी.
- अर्ज भरल्यानंतर अर्ज परत चेक करा सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केलेले आहे आहेत की याची खात्री करा.
- अर्ज मंजूर झाल्यावर अर्जदाराला संबंधित कार्यालयातून करण्यात येईल.
Bandhakam Kamgar Kalyan Yojana|बांधकाम कामगार कल्याण योजना माहिती
योजनेची महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर कामगार हे काम करत असतात. स्वतःच्या घरापासून दूर जाऊन फोन वारा पाऊस न बघता काम करत असतात कमी पगारात त्यांना हे काम करणे पडते. कमी पगारामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते यामुळे त्यांना स्वतःच्या व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं खूप कठीण असते. कामगारांना काम करत असताना सेफ्टी किट नसते त्यामुळे अपघात जर झाला तर त्यांना जन्मासाठी अपंगत्व येते किंवा त्यांचा मृत्यू होतो. घरातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो त्यांची खाण्यापिण्याची हाल होतात. त्यामुळे राज्य सरकारने कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना ही लागू केलेली आहे या योजनेमुळे त्यांना खूप फायदा होतो.