Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजनेचे उद्दिष्ट,कोण अर्ज करू शकता,आवश्यक कागदपत्रे पात्रता,फायदे, विविध प्रकार,महत्त्वाची माहिती,आवश्यक कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती.

Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार(Sanjay Gandhi Niradhar Yojana) योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत. संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारने चालू केलेली योजना आहे. संजय गांधी निराधार योजना ही 15 ऑगस्ट 1995 पासून चालू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की जो व्यक्ती स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही. उदाहरण तो अपंग, वृद्ध ,अनाथमुले , दूरधरोग ग्रस्त अत्याचारातील महिला किंवा विधवा स्त्रिया, ज्या व्यक्तीकडे कोणतेही दुसरे उदरनिर्वाचे साधन नाही असे व्यक्तींसाठी ही योजना यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे. संजय गांधी निराधार योजना ही एक सामाजिक कल्याण योजना आहे. या योजनेचे माहिती व पात्रता अर्ज प्रक्रिया महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये समजून घेऊया.

Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना

Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना उद्दिष्ट

संजय गांधी निराधार योजनेचे उद्दिष्ट

Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे आहे की जे विधवा वृद्ध अनाथ दिव्यांक व गंभीर आजारांपासून पीडित आहेत असे जे लोक ज्यांच्या उपजीविकेसाठी दुसरे काही साधन नाही अशा लोकांना आत्मनिर्भर बनवणे स्वतःच्या हिमतीवर जगवणे. संजय गांधी निराधार योजनेतून समाजातील वंचित आणि कमजोर वर्गांना आर्थिक मदत मिळते. या योजनेमुळे त्यांना जीवन हे सन्मान जनक वाटते. ही योजना अशा लोकांसाठी एक जीवनदान ठरते. या योजनेचे लाभातून गरजू व्यक्ती आपले जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतात.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अंध अपंग व्यक्ती अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती घटस्फोटीत महिला परित्य महिला वेश्या व्यवसायापासून मुक्त झालेल्या महिला अत्याचारी महिला ट्रान्सजेंडर इत्यादींना पैशाच्या स्वरूप आर्थिक मदत दिली जाते.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा प्रत्येकी 1000 आणि एकापेक्षा अधिक लाभ घेणारे एकाच कुटुंबातील व्यक्तींना 1200 रुपये मिळते ही रक्कम त्यांना त्यांचे अपत्याचे वय 25 वर्ष होईपर्यंत किंवा ती तो स्वतः नोकरी करेपर्यंत दिली जाते.तोपर्यंत लाभार्थ्यांना ही रक्कम दिली जाते.

Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना पात्रता

संजय गांधी निराधार योजनेचे पात्रता

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • वृद्धांना वय मर्यादा: या योजनेचा जर वृद्धांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांचे 65 वर्षेच्या आत वय पाहिजे.
  • विधवांना लाभ: या योजनेअंतर्गत विधवा महिला लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं वय 18 वर्षाच्या वरती पाहिजे.
  • अनाथ मुले: ज्या मुलांच्या आई-वडिलांचे निधन झालेलं असेल. त्या मुलांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असायला हवं.
  • अपंग व्यक्ती: ज्या व्यक्तींची शारीरिक व मानसिक क्षमता 40% पेक्षा जास्त असेल.
  • रोग पीडित व्यक्ती: कुष्ठरोग एड्स कॅन्सर व इत्यादी अजून गंभीर रोग असलेले व्यक्ती.
  • आर्थिक परिस्थिती ग्रामीण भाग: जर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ग्रामीण क्षेत्रांमध्ये असेल तर तुमचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापेक्षा कमी पाहिजे.
  • आर्थिक परिस्थिती शहरी विभाग: जर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही शहरी भागात राहत असेल तर तुमचं उत्पन्न 24 हजारापेक्षा कमी पाहिजे.
  • रहिवाशी: अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.अर्जदारकडे रहिवासी प्रमाणपत्र असण आवश्यक आहे.लाभार्थी हा महाराष्ट्राचा 15 वर्षापासून रहिवासीअसायला पाहिजे
  • अन्य पेन्शन: जर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना अन्य कोणती शासकीय पेन्शन चालू नसावी.अर्जदाराचे नाव दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत असायला पाहिजे.

शासन निर्णय :संजय गांधी निराधार योजना

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकता

  • निराधार पुरुष आणि महिला 65 वर्ष खालील.
  • अपंग व्यक्तीच्या असलेले सर्व श्रेणी.
  • क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारखे गंभीर आजार असलेले महिला व पुरुष.
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पत्नी.
  • ज्या महिलांचा वेश्याव्यवसायातून छळ झालेला आहे अशा महिला.
  • ट्रान्सजेंडर
  • अविवाहित 35 वर्षांची महिला.
  • जे व्यक्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे अशा व्यक्तींची पत्नी.

Sanjay Gandhi Niradhar Yojana| संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. उत्पन्न प्रमाणपत्र
  4. बँक खाते पासबुक
  5. जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे दाखला
  6. विधवा प्रमाणपत्र (विधवा महिलांसाठी)
  7. आई-वडील मृत्यू प्रमाणपत्र (अनाथ मुलांसाठी)
  8. दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग व्यक्तींसाठी)
  9. वैद्यकीय प्रमाणपत्र (गंभीर आजारग्रस्त व्यक्तींसाठी)
  10. पासपोर्ट साईझ फोटो

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

लाभार्थ्यांची यादी: संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजनेचे लाभ

संजय गांधी निराधार योजनेचे लाभ खालील प्रमाणे.

  1. जर एका कुटुंबात एक लाभार्थी असेल तर त्याला प्रतिमा हजार रुपये मिळेल.
  2. एकाच कुटुंबातील जर दोन लाभार्थी असेल तर त्यांना प्रतिमा बाराशे रुपये मिळेल.
  3. लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

Sanjay Gandhi Niradhar Yojana|संजय गांधी निराधार योजना फॉर्म online

संजय गांधी निराधार योजनेची अर्ज प्रक्रिया

संजय गांधी निराधार योजनेसाठी आपण दोन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन आणि ऑनलाईन.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • या योजनेसाठी अर्ज ऑफलाइन करण्यासाठी जवळच्या तहसील कार्यालय किंवा समाजकल्याण विभागाला भेट द्या.
  • त्यांच्याकडून योजनेचा अर्ज प्राप्त करा व योग्य रित्या अचूक भरा.
  • भरलेल्या अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडा.
  • कागदपत्रे सोडल्यानंतर अर्ज कार्यालयाला समाज कल्याण विभागाला सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर वेळोवेळी तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा.
  • तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभाची रक्कम थेट तुमच्या बँकेतील जमा केली जाईल.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जा. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
  • यानंतर तुम्ही पहिले जर नोंदणी करेल असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा .
  • जर तुम्ही नवीन युजर असेल तर न्यू रजिस्टर वरती क्लिक करा. तुमची वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी भरून तुमची एक खाते तयार करा. खाते तयार केल्यानंतर ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करा.
  • मुख्य पेज वरती योजनेची यादी दिसेल तिथे क्लिक करा त्यावरती तुम्हाला संजय गांधी निराधार योजना हा पर्याय निवडा.
  • यानंतर पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर वेळोवेळी तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा.
  • जर तुमी योजनेसाठी पात्र ठरला तर लाभाची रक्कम तुमी दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

अजून वाचा : PM Kisan Tractor Yojana|पीएम किसान ट्रॅक्टर योजना

संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती

संजय गांधी निराधार योजना ही 65 वर्षांखालील महिलांसाठी अनाथ मुलांसाठी विकलंंग लोकांसाठी टीव्ही कर्करोग हेड्स आणि कुष्ठरोगी असे गंभीर आजार असणाऱ्या पीडित लोकांसाठी निराग्रस्त परिवारांसाठी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवारासाठी निराशक्त तलाक सुद्धा महिलांसाठी विधवा महिलांसाठी खूप फायद्याची ठरते. या योजनेअंतर्गत हे सगळे लोक आपला उदरनिर्वाह चालवतात व त्यांना जगण्याची एक नवी दिशा मिळते.

या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला हजार रुपये मिळतात जर एकाच कुटुंबामधून दोन लाभार्थी असेल तर त्यांना प्रतिमा बाराशे रुपये दिला जातात यामुळे त्यांना खूप फायदा मिळतो.लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करणे हा राज्य सरकारचा मुख्य हेतू आहे.